Gangavarhe

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

कार्यालय वेळ स. १०:००AM ते सायं. ०५:००PM

शासकीय सुट्टी रविवार बंद

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

“महाराष्ट्र राज्य सहकारी व आदिवासी विकास महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक”

whatsapp image 2025 09 12 at 8.29.58 pm

महाराष्ट्र राज्य सहकारी व आदिवासी विकास महामंडळ आयोजित या बैठकीत विविध जिल्ह्यांतील अधिकारी, पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले. ग्रामविकास, आदिवासी क्षेत्रातील उपक्रम, शाश्वत विकास आणि गावागावात सेवा पोहोचवण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मार्गदर्शक धोरणे ठरविण्यात आली.

विभागमाहिती
१. गावातील पाणी पुरवठा व्यवस्थापन माहितीएकूण कुटुंब संख्या: ३४७
वैधिक नळ कनेक्शन असलेले कुटुंब संख्या: ३४०
वैधिक नळ कनेक्शन नसलेले कुटुंब संख्या: ०७
पाण्याची टाकी व क्षमता:
१) गंगाबाई पाण्याची टाकी – ५० हजार लिटर
२) सावरगाव पाण्याची टाकी – ५० हजार लिटर
२. गावातील वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन माहितीएकूण कुटुंब संख्या: ३४७
एकूण शौचालय संख्या: ३४७
गॅटरशी जोडलेले सांडपाणी कुटुंब संख्या: २५५
एकूण शोषबुंधी असणारे कुटुंब संख्या: ९३
एकूण परसबाग असणारे कुटुंब संख्या: ०६
३. पशुवैद्यकीय दवाखानागाय-म्हैस: ४१५
बैल: २२८
एकूण पशुधन: ६४३
४. पोषण कार्यक्रमच. म. म. प्रभा विद्यालय गंगापुर रोड नाशिक
५. बालवाडी सुविधागोंदेगाव येथे ०६ कि.मी. अंतरावर आहे.
६. शाळा सुविधागोंदेगाव येथे ०६ कि.मी. अंतरावर आहे.
७. गावातील विशेष पुरस्कार१) महात्मा गांधी तंटा मुक्त गाव पुरस्कार सन २०१०–२०११ मध्ये प्राप्त.
२) निर्मल ग्राम पुरस्कार सन २०१०–२०११ मध्ये प्राप्त.
whatsapp image 2025 09 12 at 8.29.58 pm (1)
whatsapp image 2025 09 12 at 8.29.59 pm

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
गंगावऱ्हे आणि सावरगाव
लोकसंख्या आकडेवारी
1000
एकूण कुटुंब संख्या
100
पुरुष
500
स्त्री
0
आमचे ध्येय-विधान :

“ग्रामविकास, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत शाश्वत व पारदर्शक उपक्रम राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे.”
  1. गावातील मुलांना स्पर्धा परीक्षासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली
  2.  वीजेची बचत व्हावी म्हणून ७० सौर पथदीप शासनाची विविध योजना व CSR निधीतून बसविण्यात आले.
  3. अपंग लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना ग्रा.प.कडून अनुशेष १००% खर्चासह लाभ दिला आहे.
  4. ग्रामपंचायत रस्ता दुतर्फा १०० वृक्ष लागवड केलेली आहे.
  5. आदिवासी वस्ती मध्ये भूमिगत गटारीची कामे केली.
  6. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगावऱ्हे,सावरगाव व सर्वज्ञ मध्यानिक विध्यालय गंगावऱ्हे या तीनही शाळेमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
  7. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगावऱ्हे, सावरगाव व सर्वज्ञ मध्यानिक विधालय गंगावऱ्हे या तीनही शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये CCTV केमेरे व्यवस्था केली.
मूलभूत मूल्ये


संस्था, शाळा, ग्रामपंचायत यांच्या कामकाजात जपली जाणारी मूलभूत तत्त्वे.
  1. SBM अंतर्गत सांडपाण्यासाठी वैयक्तिक लीचपिट व सार्वजनिक लीच पिट बांधकाम केले.
  2. ५ % पेसा अबंध निधी योजना अंतर्गत गाव अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण केले.
  3. आदिवासी वस्ती विकास (ठक्करबाप्पा योजना) व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना अंर्तगत १००% अनुशेष पूर्ण करून वस्ती मध्ये. भूमिगत गटार इत्यादी कामे पूर्ण केली आहेत.
  4. गावात १०० % भूमिगत गटार बांधकाम करून सांडपाणी व्यवस्थापन काम पूर्ण करण्यात आले आहे.
  5. सावरगाव रस्ता  सिमेंट मोऱ्या पाईप टाकून शेतीचे जोड रस्ते सुरळीत ठेवले आहेत.
  6. शाळा व अंगणवाडी डिजिटल करण्यात आली आहे.
  7. शेतकरी आत्महत्या,महिला अत्याचार निवारण/प्रतिबंध या साठी ग्रा.प.स्तरावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबीर व चर्चा सत्र आयोजित केलेली आहेत.                                                                                                                                                                       
आमची विचारधारा / कार्यतत्त्वे


“समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पारदर्शकता, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवून सातत्याने प्रयत्नशील राहणे हेच आमचे तत्त्वज्ञान आहे. आमच्या प्रत्येक उपक्रमामागे जनसामान्यांचा सहभाग व शाश्वत विकासाची बांधिलकी हीच प्रेरणा आहे.”
  1. सावरगाव येथील पाझरतलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत शेतीसाठी देण्यात आला.
  2. सुला वायनरी कंपनी णे ( csr) मधून रु.५ लाखाचे सार्वजनिक संडास जि.प.शाळासाठी बांधून घेतले.
  3. सुला वायनरी कंपनी (csr) मधून सावरगाव येथील जि.प.मराठी शाळेसाठी नवीन इमारत बांधकाम रु ३४ लाख मंजूर करून शाळा बांधकाम पुर्ण केले.
  4. गावपंच मंडळाच्या सहकार्याने लोकसहभागातून जि.प.शाळा साठी शैक्षणिक साहित्य प्राप्त करूण घेतले.
  5. गाव शिवारातील सर्व शिव रस्त्यांवर सिमेंट मोऱ्या पाईप टाकून शेतीचे जोड रस्ते सुरळीत ठेवले आहेत.
  6. सुला वायनरी कंपनी णे ( csr) मधून ग्रा.प.कार्यालय कार्यक्षेत्रात सौर उर्जेवर आधारित वीज पुरवठा सौर पोल संख्या ७० मंजूर करून घेतला आहे.
  7. सुला वायनरी कंपनी कडे सतत पाठपुरावा करून गावासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या व डसबिन उपलब्ध करून घेतले.
  8. CSR अंतर्गत ग्रा.प.साठी घंटागाडी  ट्रक्टरद्वारे नेहमी  कचरा  उचलला जातो .ही सुविधा उपलब्ध करून घेतले आहे.
  9. गाव टेकडी मोजणी करून त्या ठिकाणी १५०० वृक्ष लागवड केली आहे.

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी