ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवडलेल्या आदर्श ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यासाठी आयोजित पुरस्कार वितरण समारंभ
आमची यशोगाथा
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन २०२३ -२०२४ सेवा विषयक तपशील
१) ग्रामसेवकाचे नाव:- श्री. प्रशांत बंकट कानडे
२) जन्म तारिख :-०५/४/१९९०
३) शिक्षण :- बी.ए.डी.एड, पदविका
४) सेवेत रुजू दिनांक :-०७/३/२०१३
५) सेवा तपशिल :-
लोकसंख्या आकडेवारी
गंगावऱ्हे आणि सावरगाव
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय गंगावऱ्हे-सावरगाव
तर्फे राबवण्यात येणारे उपक्रम
ग्रामपंचायत सुदृढकरण साठी गावात विविध समिती स्थापन करण्यात आले असून प्रत्येक समिती तिचे कामकाज पार पाडत आहे.
ग्रामीण शौचालय कार्यक्रम
१५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत जि.प.शाळेत शौचालय बांधकाम
जलशुद्धीकरण व पाण्याचीटाकी
ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे सावरगाव मध्ये जलशुद्धीकरण व पाण्याचीटाकी
डास मुक्ती प्रतिबंध
गावात फवारणी व धुरळनी करून डास मुक्ती साठी प्रतिबंध करण्यात आले आहे
विधी शेड
ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे सावरगाव ता.जि.नाशिक येथील दशक्रिया विधी शेड
प्राथमिक शाळा
सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत
सौर पोल
सुला वायनरी कंपनीने ( CSR ) मधून ग्रा.प.कार्यालय कार्यक्षेत्रात सौर उर्जेवर आधारित वीज पुरवठा सौर पोल मंजूर करून घेतले आहे.
रेन वाटर हार्वेस्टिंग
गावातील शासकीय इमारतींना रेन वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर करण्यात आलेले आहे.
ग्रीन जिमची
CSR निधीतून ग्रीन जिमची स्थापना
गावातील सर्वसाधारण माहिती
गोदावरी नदी व गंगापूर धरणाच्या पश्चिमेस वसलेले गंगावऱ्हे व सावरगाव हि दोन्ही गाव पुनर्वसित असून प्राचीन वारसा असलेली आदिवासी बहुल गावे आहेत. हि दोन्ही गाव नाशिक तालुक्यातील असून नाशिकच्या पश्चिमेस नाशिक पासून गंगापूर मार्गे १७ कि.मी. अंतरावर आहे. मुख्य बाजारपेठ नाशिक व गिरणारे अवघे १० कि. मी. आहे. सावरगाव येथे प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर असून एक धार्मिक स्थळ आहे.
गंगावऱ्हे हि ग्रामपंचायत गंगावऱ्हे व सावरगाव या दोन गावांची मिळून ग्रामपंचायत असून दि. ११/०६/१९६६ रोजी स्थापन झालेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे-सावरगाव ग्रामपंचायत मध्ये ०३ वार्ड असून सदस्य संख्या १० आहे.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती व मासेमारी असून मुख्य पिक भात व बाजीपला आहे. बागायती क्षेत्रामध्ये टोमेटो, कोबी, कांदा,गवार व इतर भाजीपाला तसेच गहू, हरभरा पिकविला जातो. काही ग्रामस्थ पारंपारिक पद्धतीने शेळी पालन, गुरे पालन व कोंबडी पालन करतात. काही ग्रामस्थ नाशिक येथे एम.आय.डी.सी. मध्ये व इतर ठिकाणी कामाला जातात. गावामध्ये द्राक्षापासून वाईन तयार करण्यासाठी वाईनरी असून तेथे देश विदेशातील पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे गावातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध झालेला आहे. गाव हे गंगापूर धरणाच्या कडेला वसलेले असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात त्यामुळे गावात पर्यटनाला मोठी चालना मिळत असते.
गंगावऱ्हे व सावरगाव या गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धोंडेगाव येथे ०४ कि.मी. व आरोग्य उपकेंद्र गोवर्धन येथे ०६ कि.मी. अंतरावर आहे. ग्रामीण रुग्णालय १४ कि.मी. अंतरावर गिरणारे येथे आहे.
सेवा विषयक तपशील
१) पंचायत समिती त्र्यंबकेश्वर दिनांक :- ०७/३/२०१३ ते ०६/५/२०१३.
२) ट्रेनिंग कालावधी दिनांक :-०७/५/२०१३ ते १३/०८/२०१३.
३) ग्रामपंचायत खंबाळे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक सेवा कालावधी :- दिनांक :- १४/०८/२०१३ ते ०९/८/२०२१.
४) ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे सावरगाव ता. नाशिक जि. नाशिक सेवा कालावधी :- दिनांक :- १०/०८/२०२१ ते आजपावेतो
५) अतिरिक्त कार्यभार महिरावणी ता. नाशिक जि. नाशिक सेवा कालावधी :- दिनांक : १८/०७/२०२४ ते १८/११/२०२४.
रौप्य महोत्सवी वर्षात २५,००० झाडांची लागवड करून सुला विनयार्ड्सने जपली सामाजिक बांधिलकी
- २५,००० झाडांची लागवड
रौप्य महोत्सवी वर्षात २५,००० झाडांची लागवड करून सुला विनयार्ड्सने जपली सामाजिक बांधिलकी
सुला विनयार्ड्सने सामाजिक बांधिलकी उपक्रम अंतर्गत २५,००० वृक्षरोपण करून भक्कम योगा साजरा केला आहे. …
(खाली मजकूरात)
पर्यावरणपूरक उपक्रम, जमिनीचे संवर्धन, स्थानिक समाजाच्या सहभागातून प्रकल्प, यामुळे सुला विनयार्ड्सने सामाजिक जबाबदारी जपली आहे.
सदर उपक्रमांतर्गत सुला परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. त्यात २५ हून अधिक प्रजातींचा समावेश आहे. या झाडांमध्ये अंजन, बाभूळ, करंज, खैर, चिंच, सीताफळ, हिरडा, बेहडा, पिंपळ, आंबा, करंजी, वड, जांभूळ, अशोक, गुलमोहर, रानजाई, पळस इत्यादी स्थानिक झाडांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर उपक्रम राबविताना गाळ हटवणे, जमिनीचे सुपिकरण व पर्यावरण संवर्धन हे तीन उद्दिष्ट ठेवण्यात आले. या उपक्रमामुळे तलावातील गाळ हटल्याने जलसाठवण क्षमता वाढणार आहे, सुपीक माती जमिनीत गेल्याने पिकांचे उत्पादन वाढणार आहे, आणि शेतकऱ्यांचा खर्चही कमी होणार आहे.
सगळ्या पात्र कुटुंबाना वृद्धपकाळ ,अपंग आणि विधवा पेन्शन योजना.
वृद्ध पेन्शन योजना
आपली सुरक्षितता , आपली विमा योजना
विमा योजना योजना
प्रशासकीय संरचना
गोदावरी नदी व गंगापूर धरणाच्या पश्चिमेस वसलेले गंगावऱ्हे व सावरगाव हि दोन्ही गाव पुनर्वसित असून प्राचीन वारसा असलेली आदिवासी बहुल गावे आहेत.

माध्यमिक शाळा गंगावऱ्हे माहिती
शाळेचे नाव - सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय गंगावऱ्हे
एकूण शाळा : ०१ गंगावऱ्हे :०१
एकून शिक्षक : ०३
एकून विद्यार्थी : १३३
एकून शौचालय : ०२
एकूण मुतारी : ०३
वर्ग : ८ते १०
गावातील शाळेतील शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी गंगापूर,नाशिक व इतर ठिकाणी जात असतात.

अंगणवाडी माहिती
एकुण अंगणवाडी : ०२ गंगावर्हे ०१ सावरगाव ०१
एकुण अंगणवाडी कार्यकर्ती :
०२ गंगावर्हे - ०१ सावरगाव ०१
एकुण लाभार्थी : १५४ गंगावर्हे - १०७ सावरगाव ४७
एकुण शौचालय : ०२ गंगावर्हे ०१ सावरगाव ०१

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहिती
एकूण शाळा : २ गंगावऱ्हे :०१ सावरगाव-०१
एकून शिक्षक : १२ गंगावऱ्हे:०८ सावरगाव-०४
एकून विद्यार्थी : ३३९ गंगावऱ्हे:२३०
सावरगाव-११९
एकून शौचालय : ६ गंगावऱ्हे:०४ सावरगाव-०२
एकूण मुतारी : ११ गंगावऱ्हे:०८ सावरगाव-०३
वर्ग : गंगावऱ्हे-१ ते ७ सावरगाव – १ ते ५
गंगावऱ्हे गावाची लोकसंख्या जनगणना
२०११ नुसार
-
एकूण लोकसंख्या :- एकूण १३८१
पुरुष : ७५० स्त्री : ६३१ -
अनु.जाती :- एकूण १६७
पुरुष : ८७ स्त्री : ८० -
अनु.जमाती :- एकूण ९५०
पुरुष : ५१४ स्त्री : ४३६ -
इतर :- एकूण : २६४
पुरुष : १४९ स्त्री : ११५ - एकूण कुटुंब संख्या :- २३२
सावरगाव गावाची लोकसंख्या जनगणना
२०११ नुसार
-
एकूण लोकसंख्या :- एकूण : ७२२
पुरुष : ३८२ स्त्री : ३४० -
अनु.जाती :- एकूण : १५
पुरुष : ०८ स्त्री : ०७ -
अनु.जमाती :- एकूण : ६९५
पुरुष : ३६८ स्त्री :३२७ -
इतर :- एकूण : १२
पुरुष : ०६ स्त्री : ०६ - एकूण कुटुंब संख्या :- ११५
चांगली शासन व्यवस्था
ग्रामपंचायत सुदृढकरण साठी गावात विविध समिती स्थापन करण्यात आले असून प्रत्येक समिती तिचे कामकाज पार पाडत आहे.आरोग्य पोषण स्वच्छता समिती,दारू बंदी समिती,कर आकारणी समिती,तंटा मुक्त समिती इ.समित्या स्थापन केल्या आहेत.
बचत गटाचे नाव व करत असलेले व्यवसाय
ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे सावरगाव ता.जि.नाशिक येथील बचत गट यांची नावे व करत असलेले व्यवसाय पुढील प्रमाणे..
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
गावाचा नकाशा व दिशा पट
या नकाशा व दिशा-पटाच्या मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
ग्रामपंचायत कार्यालय
गंगावऱ्हे-सावरगाव ता. जि. नाशिक
२५,००० घनमीटर
त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ३०% ने वाढली आहे.
मोफत सेवा ग्रामपंचायत तर्फे
सावरगाव येथील पाझरतलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत शेतीसाठी देण्यात आला
सावरगाव परिसरातील पाझर तलावात दीर्घकाळ साचलेला गाळ काढण्याचे काम ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने करण्यात आले. तलावातील गाळामुळे जलसाठवण क्षमता कमी होत असल्याने तो काढून टाकणे आवश्यक होते. या उपक्रमाअंतर्गत काढलेला सुपीक गाळ शेतजमिनींच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला. या प्रक्रियेमुळे एकीकडे तलावाची स्वच्छता व जलसाठवण क्षमता वाढणार असून दुसरीकडे शेतकऱ्यांना मातीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि पिकांच्या उत्पादनात भर घालण्यासाठी मदत मिळणार आहे. या उपक्रमातून ग्रामीण भागात जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे पुनरुत्थान आणि शाश्वत शेतीसाठी प्रयत्न होत असल्याचे उदाहरण दिसते.
- तलावाची जलसाठवण क्षमता वाढली
- शेतजमिनींची सुपीकता वाढली
- शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला
काही छायाचित्र





